किल्लेधारूर दि.२३(वार्ताहर) आज शहर व तालुक्यातील १७ लोकांचे थ्रोट स्वॅब अहवालाची प्रतिक्षा आहे. यात शहरातील बाधिताच्या कुटूंबातील व जवळच्या संपर्कातील ९ जनांचा समावेश असल्याने नागरीकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. काही वेळात या नमुन्याचा अहवाल प्राप्त होणार आहे. आज शहरामधून नवीन ११ स्वॅब तपासणीसाठी अंबाजोगाई स्वा.रा.ति. प्रयोगशाळेत पाठवण्यात आली असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सचिन शेकडे व वैद्यकीय अधिक्षक डॉ.चेतन आदमाने यांच्या कडून मिळाली.
धारुर शहरातील एका ज्येष्ठ नागरीकास कोरोनाची लागण झाल्याचे निदर्शनास आले होते. या बाधितावर उपचार करणाऱ्या डॉक्टर व कर्मचाऱ्यांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. तर काल या बाधिताच्या संपर्कातील व कुटूंबातील ९ जनांसह १७ स्वॅब तपासणीस पाठवण्यात आले होते. या अहवालाची उत्कंठा लागली असून थोड्या वेळात अहवाल प्राप्त होणार आहेत. राज्यातील हॉटस्पॉट झोन मधून आलेल्या व ज्यास ५ ते १४ दिवस पुर्ण झालेत अशा शहरातील ११ व्यक्तींचे स्वॅब आज घेण्यात आले आहेत. उद्या रात्री पर्यंत या ११ नमुन्याचे अहवाल येणार असल्याची माहिती डॉ. शेकडे व डॉ.आदमाने यांनी दिली.
कृपया आपल्या बातम्या जास्तीत जास्त शेअर करा….