किल्लेधारूर दि.२७ आगस्टः- काल रात्री पाठवलेल्या १० स्वॅब पैकी शहरातील १ व तालुक्यातील अंजनडोह व गांवदरा येथील प्रत्येकी १ असे ३ जन पॉझिटीव्ह आली आहेत.
आज तालुक्यात २८ व्या दिवशी ३ रुग्णांची भर पडली आहे. कालच्या १० स्वॅब पैकी शहरात १ व तालुक्यात २ असे ३ जन पॉझिटीव्ह आढळली आहेत. यात तालुक्यातील अंजनडोह १ व गांवदरा येथील १, शहरातील १ असे २ सहवासित तर १ नवीन रुग्ण आढळली आहेत.
१) ९० वर्षीय स्त्री, (अंजनडोह, ता.धारुर, सहवासित)
२) ६२ वर्षीय पुरुष, (गावंदरा, ता.धारुर, नवीन)
३) ४५ वर्षीय पुरुष , (गायकवाड गल्ली, धारूर शहर, सहवासित)
थोड्या वेळात जिल्ह्याची आजची आकडेवारी जाहीर होणार आहे. आरोग्य विभागाने पुढील कारवाई सुरु केली आहे.