BEED24

धारुरमध्ये थर्मल फिवर स्क्रिनिंग तपासणी

किल्लेधारूर दि.३०(वार्ताहर)माजलगांव मतदार संघाचे आ. प्रकाशदादा सोळंके यांच्या वतीने माजलगाव नंतर आता धारुर शहरात फिवर स्क्रीनिंग करण्यास सकाळी सुरुवात झाली. यावेळी आ. प्रकाशदादा सोळंके स्वतः शहरातील विविध भागात तपासणी पथकासह उपस्थित होते.

शहरातील आठ प्रभागासाठी आरोग्य विभागाने आठ आरोग्य पथक तयार करुन घरोघरी जाऊन जनतेची फिवर स्क्रिनिंग तपासणी करण्यास सकाळी ८ वाजल्यापासून सुरुवात केली. आ.प्रकाशदादा सोळंके यांनी विविध भागात जाऊन तपासणी पथकासह भेटी देत कोणताही नागरिक तपासणी पासुन वंचित राहणार नाही याची काळजी घेतली. माजलगाव नंतर आता धारुर शहरातही आ. प्रकाशदादा सोळंके यांच्या वतीने प्रभाग निहाय फिवर स्क्रिनिंग करण्यात येत आहे. यावेळी माध्यम प्रतिनिधिशी बोलताना आ. सोळंके यांनी कोरोनाचे संकट हे संपूर्ण मानवजातीवर आलेले संकट असून या संकटात सर्व भेद विसरून एकत्र लढा देण्याची गरज असल्याचे सांगत प्रशासनाच्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले. यावेळी माजलगाव कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती आशोक डक,
राष्ट्रवादीचे जिल्हा कोषाध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष माधव निर्मळ, जिल्हा सरचिटणीस सय्यद शाकेर, शहराध्यक्ष नितिन शिनगारे, ज्येष्ठ पत्रकार अनिल महाजन, सय्यद हारुण  यांच्यासह तालुका आरोग्य अधिकारी सचिन शेकडे, वैद्यकिय अधिक्षक डॉ. चेतन आदमाने, डॉ. परवेज शेख, डॉ. मारुती लगड आदींची उपस्थिती होती.

Exit mobile version