BEED24

धारुरला धक्का; एक पॉझिटीव्ह

किल्लेधारूर दि.६(वार्ताहर) धारुर शहरातून आज पाठवण्यात आलेल्या १३ पैकी मुंबईहून आलेल्या  एका दहा वर्षीय बालकाचा अहवाल पॉझिटीव्ह आल्याने खळबळ उडाली आहे.

शहरातील बाहेर गावाहून आलेल्या लोकांचे स्वॅब नमुने आरोग्य विभागाकडून घेण्यात येत आहेत. शहरातील आशोक नगर भागातील मुंबईहून आलेल्या कुटूंबियातील पाच व्यक्तींचे स्वॅब आज पाठवण्यात आले होते. यापैकी एका दहा वर्षीय बालकाचा अहवाल पॉझिटीव्ह आला असून दोन निगेटिव्ह व दोन अनिर्णित असल्याची माहिती डॉ. सचिन शेकडे यांनी दिली.

Exit mobile version