BEED24

धारुरात एक तर जिल्ह्यात २७ पॉझिटीव्ह

बीडः रात्री एक वाजता आलेल्या अहवालात बीड जिल्ह्यात कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांचा आकडा आज २७ ने वाढला आहे. गेली काही दिवस शांत असलेल्या धारुर तालुक्यात पुन्हा एक रुग्ण आढळून आल्याने धारुर तालुका ॲक्टीव झाला आहे.

रात्री एक वाजता आलेल्या अहवालानुसार बीड शहरात ६ तर तालुक्यातील घोसापुरी येथे एक अशी एकुण ७, अंबाजोगाई शहरात तब्बल ७ पॉझिटीव्ह आढळली आहेत. याशिवाय परळी शहरात ६, आष्टी तालुक्यातील धामणगाव येथे ३ व हातोला येथे १, गेवराई शहरात १ व तालुक्यात सुलतानपुर येथे १ असे २ तर धारुर तालुक्यातील चोंडी येथे १ अशा एकुण  २७ नवीन रुग्णांची भर पडली आहे. यात १० जन पॉझिटीव्ह रुग्णाच्या सहवासित किंवा संपर्कातील तर १७ रुग्ण नवीन आहेत. आजच्या अहवालात १५ पुरुष तर १२ महिला संक्रमित आहेत. जिल्ह्याचा पॉझिटीव्ह रुग्णांचा आकड्यासह मरण पावणाऱ्या रुग्णाचा आकडाही वाढत आहे.

Exit mobile version