BEED24

धारुर तालुक्यातील तेलगाव येथील एकाचा स्वॕब पाठवला

किल्लेधारूर दि.३०(वार्ताहर) तालुक्यातील तेलगाव येथून एका संशयिताचा स्वॕब केज उपजिल्हा रुग्णालयातून लातूर येथे पाठवण्यात आला.

तालुक्यातील तेलगाव येथे ग्राम सुरक्षा पथकाकडून माहिती मिळताच आरोग्य पथकाने संबंधित व्यक्तीची भेट घेतली. सदरील व्यक्ती मुंबई येथून आलेली असल्याने तात्काळ दखल घेण्यात आली. तालुका आरोग्य अधिकारी डॉ.सचिन शेकडे यांनी रुग्णवाहिकेतून सदरील संशयितास केज उपजिल्हा रुग्णालयात हलवले. तापीचे लक्षण आढळल्याने केज येथून संबधित संशयिताचे नाक व घशातील स्वॕब नमुने तपासणीसाठी लातुर येथील प्रयोगशाळेत पाठवले असल्याची माहिती डॉ. शेकडे यांच्या कडून मिळाली.

Exit mobile version