BEED24

धारुर तालुक्यातील दोन कोरोना पॉझिटीव्ह

बीड दि.२०(वार्ताहर) मुळ धारुर तालुक्यातील चिंचपूर येथील रहिवासी असलेल्या  दोघांना आज कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आले. आज जिल्ह्यातून पाठवलेल्या ७७ पैकी ९ रुग्ण पॉझिटीव्ह आली आहेत.

धारुर तालुक्यातील चिंचपुर येथील मुळ रहिवासी असलेल्या मात्र सध्या औरंगाबाद येथे रोजंदारीसाठी स्थायिक असलेल्या तीघांचे थ्रोट स्वॕब बीडहून पाठवण्यात आले होते. औरंगाबादहून गावाकडे जात असताना अचानक त्रास जाणवल्याने बीड येथील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाले होते. दाम्पंत्य व मुलगा अशा तिघांचे स्वॕब घेतले होते. यात आई व मुलगा पॉझिटीव्ह असल्याचे आढळून आले.
आज पाठवलेल्या  ७७ स्वॅब पैकी ६८ निगेटिव्ह तर ९ पॉझिटीव्ह अहवाल आले आहेत. या पॉजिटिव्ह अहवालात झमझम कॉलनी बीडचे दोन, शहेनशाह नगर बीडचा एक, बशीरगंज बीड चे चार तर चिंचपूर ता.धारुरचे औरंगाबादहून आलेल्या   दोघांचा समावेश आहे.

Exit mobile version