BEED24

धारुर दोन तर केज १७ पॉझिटीव्ह; जिल्ह्यात ७५

बीडः दि.४ आगस्ट- काल पाठवलेल्या १९ अहवाला पैकी धारुर शहरात पुन्हा दोन रुग्ण आढळून आले आहेत. दोन्ही पॉझिटीव्ह रुग्णाच्या सहवासित आहेत. शहरात गेल्या चार दिवसात सतत पॉझिटीव्ह रुग्ण संख्या वाढत आहे. आज धारुर व धर्मापुरीतील प्रत्येकी एक असे दोन जन दगावले आहेत. जिल्ह्यात आजही रुग्ण संख्या ७५ आहे. यात सर्वाधिक बीड २७ तर केज मध्ये १७ आहेत.

धारुर शहरात गेल्या चार दिवसात अकरा तर आज दोन पॉझिटीव्ह आढळून आले आहेत. आजच्या अहवालात खाटीक गल्लीतील पॉझिटीव्ह रुग्णाच्या सहवासित पॉझिटीव्ह आढळून आले आहेत. जिल्ह्यात आज ७५ पॉझिटीव्ह रुग्ण आढळून आली.  धारुरमध्ये दोन पॉझिटीव्ह आढळून आल्याची अधिकृत माहिती आहे. दि.३१ रोजी पॉझिटीव्ह आढळून आलेल्या रुग्णाच्या सहवासातील ४५ वर्षीय व ३३ वर्षीय पुरुषांचा यात समावेश आहे.  धारुर शहरात वाढत असलेली संख्या चिंताजनक असल्याने शासनाने किमान दहा दिवसांचा बंद जाहिर करण्याची मागणी होत आहे. याबाबतीत जनतेने सतर्कता बाळगुन सर्व नियम पाळत घरात राहण्याचे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.

Exit mobile version