BEED24

धारुर प्रभाग सुरक्षा समितीची साडेचार वाजता बैठक

किल्लेधारूर दि.१९(वार्ताहर) शहरात स्थापित करण्यात आलेल्या प्रभाग सुरक्षा समितीच्या बैठका थोड्या वेळात नगर परिषद सभागृहात होत आहेत.

कोविड १९ विषाणू प्रतिबंधात्मक उपाययोजना संदर्भात शहरातील सुरक्षा समितीच्या सदस्यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. समितीचे कार्य व जबाबदाऱ्या बाबत तालुका आरोग्य अधिकारी डॉ.सचिन शेकडे व वैद्यकीय अधिकारी डॉ. चेतन आदमाने या बैठकीत मार्गदर्शन करणार आहेत. सोशल डिस्टन्समुळे बैठक दोन टप्प्यात घेण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यात प्रभाग क्रमांक १ ते ४ ची बैठक ४ वाजून २५ मिनिटांनी तर प्रभाग क्रमांक ५ ते ८ ची बैठक ५ वाजून २० मिनिटांला होत आहे. सदरील बैठका धारुर नगर परिषद सभागृहात होत असुन सर्व सुरक्षा समिती सदस्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन मुख्याधिकारी सुहास हजारे यांनी केले आहे.

Exit mobile version