किल्लेधारूर दि.३० आगस्टः- काल रात्री पाठवलेल्या ५२ स्वॅब पैकी तालुक्यात ७ जन पॉझिटीव्ह आली आहेत. यात धारुर शहरात काल लागलेला ब्रेक निघून मीटर सुरु झाले असुन शहरात ६ तर तालुक्यात १ रुग्ण पॉझिटीव्ह आढळून आली आहेत.
आज तालुक्यात ३१ व्या दिवशी ७ रुग्णांची भर पडली आहे. काल शहरातील केवळ एक स्वॅब असल्याने ब्रेक मिळत दिलासादायक बातमी आली होती. आज मात्र शहराचे मीटर सुरु होवून ६ रुग्ण पॉझिटीव्ह आढळून आली आहेत. कालच्या ५२ स्वॅब पैकी तालुक्यात ६ जन पॉझिटीव्ह आढळली आहेत. यात शहरात १ नवीन तर तालुक्यातील हिंगणी बुद्रुक येथील एकासह ६ सहवासित असे ७ पॉझिटीव्ह आढळली आहेत.
1) 14 वर्षीय स्त्री कुंभार गल्ली, धारूर, सहवासित
2) 10 वर्षीय स्त्री कुंभार गल्ली, धारूर,सहवासित
3) 34 वर्षीय स्त्री कुंभारगल्ली, धारूर, सहवासित
4) 46 वर्षीय स्त्री कुंभारगल्ली, धारूर, सहवासित
5) 67 वर्षीय पुरुष हिंगणी बुद्रुक सहवासित
6) 60 वर्षीय पुरुष काशिनाथ चौक, धारूर,नवीन
7) 50 वर्षीय पुरुष प्रतिभानगर, धारुर, सहवासित
थोड्या वेळात जिल्ह्याची आजची आकडेवारी जाहीर होणार आहे. आरोग्य विभागाने पुढील कारवाई सुरु केली आहे.