BEED24

धारुर शहरातील दुसरा स्वॕब बीडहून

किल्लेधारूर दि.२८(वार्ताहर) शहरातील दुसऱ्या एका व्यक्तीचा स्वॕब नमुना बीड येथील रुग्णालयातून पाठवण्यात आला असून अंबाजोगाई येथून यापुर्वी एकाचा स्वॕब पाठवण्यात आला आहे. दोन्ही नमुन्याच्या अहवालाची प्रतिक्षा असुन शहरात यामुळे दहशत निर्माण झाली आहे.

आज धारुर शहरातील एक व्यक्ती चार दिवसांपासून अंबाजोगाई येथे स्वा.रा.ति. रुग्णालयात उपचार घेत आहे. त्या व्यक्तीचे अंबाजोगाई येथून स्वॕब लातूरला पाठवण्यात आले. तर जून्या आजारावर उपचार घेत असलेल्या दुसऱ्या एका व्यक्तीचा स्वॕब बीड येथून पाठवण्यात आला आहे. सदरील व्यक्तीच्या प्रवासाची पार्श्वभूमी आहे. तो औरंगाबाद येथे उपचार घेवून धारुरला आला असून यानंतर बीड येथे खाजगी रुग्णालयात उपचार घेत होता. त्यास बीड येथील विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. यामुळे धारुर शहरातील दोघांच्या स्वॕब नमुन्याच्या अहवालाची प्रतिक्षा धारुरकरांना लागली आहे.

Exit mobile version