BEED24

धारुर शहराला धक्का

किल्लेधारूर दि.२८(वार्ताहर) शहरातील दुधियापुरा भागातील युवक कोरोना बाधित आढळला असल्याने शहरात खळबळ माजली आहे. दुसरा स्वॕब निगेटिव्ह आला असून जिल्ह्यातील ४१ पैकी पाच पॉझिटीव्ह रुग्ण आढळले आहेत.

सदरील  तरुणावर औरंगाबाद येथे अनेक दिवसांपासून उपचार सुरु आहेत. बाधित तरुण औरंगाबादहून २५ तारखेला धारुरला ईदसाठी आल्याची माहिति आहे. तर त्याच्या दोन्ही किडन्या गेलेल्या असल्याचे कळते. दि.२६ रोजी तो धारुरहून दुचाकीने बीड येथे उपचारासाठी कृष्णा हॉस्पिटलमध्ये दाखल झाला होता. शहरात कोरोनाची इंट्री झाल्याने दहशत माजली आहे. आज जिल्ह्यातून पाठवलेल्या ४१ स्वॕब पैकी ५ पॉझिटीव्ह आली आहेत.

Exit mobile version