किल्लेधारूर दि.६( प्रतिनिधी) धारूर येथील १९९५ दहावीच्या वर्ग मित्रांनी एकत्रित येत धारूर ग्रामीण रुग्णालयास सॅनिटायझर कक्ष दिले आहे. धारूर ग्रामीण रुग्णालयात गोरगरीब रुग्णाची नेहमीच वर्दळ असते. यासोबतच येथील आरोग्य विभागातील कर्मचारी व डॉक्टर यांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या उद्देशाने सॕनिटायझर कक्ष भेट देण्यात आले.
सद्या कोरोना विषाणूने जगात थैमान घातले आहे या विषाणू पासून बचाव होण्यासाठी डॉक्टर , आरोग्य कर्मचारी चोवीस तास काम करत आहेत त्यांचेही आरोग्य महत्त्वाचे आहे आरोग्याच्या दृष्टीने येथील १९९५ दहावीचे वर्ग मित्र संदीप खिलोजी, बिभीषण गायकवाड, सूर्यकांत जगताप, आनंद पिलाजी, रत्नाकर लोखंडे, सुधाकर शेळके, प्रमोद शिनगारे सोमनाथ गायके, बसवेश्वर शेटे इत्यादी वर्ग मित्रांनी एकत्रित येत सामाजिक भावनेतून येथील ग्रामीण रुग्णालयास सॅनिटायझर कक्ष दिला आहे. या कक्षात प्रवेश करताच सेन्सर द्वारे सॅनिटायझरची फवारणी होते संपूर्ण शरीर सात सेंकदात निर्जंतुक होते. हे सॅनिटायझर कक्ष दिल्याने ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.चेतन आदमाने यांनी त्यांचे आभार मानले आहेत. यावेळी आरोग्य कर्मचारी व पत्रकार बांधव उपस्थित होते.