BEED24

धारूर घाटात सिमेंटचा ट्रक पलटी;

किल्लेधारूर दि.२३ (वार्ताहर) आज सकाळी हैदराबादहून ६०० सिमेंट पोते घेवून बीड कडे जाणारा ट्रक धारूर घाटात अवघड वळणावर पलटी झाला. या अपघातात सुदैवाने जीवित हानी टळली.

ट्रक मध्ये चालक व क्लिनर होते. ट्रक पूर्णपणे चकाचुर झाला आहे. चालक व क्लिनर किरकोळ जखमी झाले आहेत. आज सकाळी धारूर घाटातून बीड कडे ६०० पोते सिमेंट घेवून जात असताना ब्रेक निकामी झाल्याने सकाळी चार वाजता समोरून येणाऱ्या स्कार्पिओ गाडीला वाचवण्यासाठी चालकांने प्रसंगावधान दाखवत गाडी डोंगर चढावर चढवली. यामुळे समोरून येणाऱ्या स्कर्पियो जीप मधील ६ प्रवाशांचे प्राण वाचले आहेत. धारूर घाटात नेहमीच अपघात घडत आहेत. येथील रस्ता रुंदीकरण होणे गरजेचे आहे. या गंभीर बाबीकडे लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष होत आहे.

Exit mobile version