BEED24

नगर परिषदेने भंगार फोगिंग मशिनने फवारणी केली

किल्लेधारूर दि.९(वार्ताहर) येथील मठ गल्लीत आलेली डेंग्यूची साथ हि नाल्याच्या गटारामुळे होत असून नगर परिषदेने भंगार फोगिंग मशिनने फवारणी केल्याचे फोटो वायरल करत जनतेची दिशाभुल केल्याचा आरोप करत मठ गल्लीच्या  दोन नगरसेवकांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास पत्राद्वारे आणुन दिले आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, गेल्या चार ते पाच दिवसांपासून शहरातील कसबा विभागात मठ गल्लीत डेंग्यूचे रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे आरोग्य विभागाच्या वतीने याभागात वैयक्तिक स्वच्छता व ड्राय डे राबवण्याचा उपाय सुचवण्यात आला आहे. याभागात मोठ्या प्रमाणात अस्वस्थता असून ठिकठिकाणी नालीचे पाणी रस्त्यावर आलेले दिसुन येते. नाल्या तुंबल्यामुळे अनेक ठिकाणी गटाराचे पाणी साचले आहे. याबाबतीत याभागातील नगरसेविका राजश्री बाळासाहेब खामकर व नगरसेवक साशिंदर गोंदणे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन दिले आहे. या निवेदनात गेल्या सहा वर्षांपासुन अंतर्गत पाईपलाईनच्या नावाखाली विविध योजनांचा निधी उपलब्ध होवुनही खर्च झालेला नाही. यामुळे निधि असताना नाली बांधकाम, ढापे आदी काम होत नसल्याने गटारी तूंबल्या आहेत. या तुंबलेल्या पाण्यावर डास होवून डेंग्यूची साथ प्रभाग ७ मध्ये आली आहे. हि साथ वेळीच उपाययोजना न केल्यास शहरभर पसरण्याचा धोकाही व्यक्त केला आहे. तर नगर परिषदेने भंगार फोगिंग मशिनने फवारणी केल्याचे फोटो वायरल करत जनतेची दिशाभुल केल्याचा आरोप निवेदनात केला आहे. निवेदनाच्या प्रति जिल्हा शल्य चिकित्सक, तहसीलदार व न.प. मुख्याधिकारी धारुर यांना दिल्या आहेत.

Exit mobile version