बीडः जिल्ह्यातील प्रलंबित स्वॅब अहवाल प्राप्त होण्यास सुरुवात झालेली असून आत्ताच आलेल्या अहवालात परळीत पुन्हा चार कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळून आली असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.
आज दुपारी बारा वाजता आलेल्या ३०५ अहवालात परळीतील ४ जन पॉझिटीव्ह एक अनिर्णित तर ३०० जन निगेटिव्ह आली आहेत. या चार पैकी दोन पॉझिटीव्ह रुग्णाच्या सहवासातील तर दोन बँकेचे ग्राहक आहेत. भारतीय स्टेट बँकेच्या संपर्कातील पॉझिटीव्ह रुग्णांचा आकडा दररोज वाढत आहे. कालच्या अहवालापैकी आणखी १२८ अहवालांची प्रतिक्षा आहे.