नवी दिल्ली: केंद्र सरकारने अनलॉक -३ ची मार्गदर्शक सुचना जाहीर केली आहे. गृह मंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचनांमध्ये काही निर्बंध हटविण्यात आले आहेत, तर काही ३१ ऑगस्टपर्यंत सुरू ठेवण्यात आले आहेत. या मार्गदर्शक तत्त्वाचे मुख्य मुद्दे पुढील प्रमाणे आहेत.
१. जिम आणि योग संस्था ५ ऑगस्टपासून सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे.
२. मेट्रो ट्रेन, सिनेमा हॉल, जलतरण तलाव आणि बारच्या सेवांवर बंदी कायम राहील.
३. सरकारने १ ऑगस्टपासून रात्रीचे कर्फ्यू काढण्याचा निर्णय घेतला आहे.
४. सर्व कंटेन्मेंट झोनमध्ये लॉकडाउन ३१ ऑगस्टपर्यंत सुरू राहिल. कंटेनमेंट झोनला सामान्य म्हणून घोषित करण्याचा अधिकार राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना असतील.