BEED24

पहिल्याच पावसात घर कोसळले;

दिंद्रुड दि.१६ (प्रतिनिधी) माजलगाव तालुक्यातील दिंद्रुड येथे गेली दोन दिवस समाधान कारक पाऊस झाला मात्र या पावसात येथिल विकास काटकर या दिव्यांगाचे घर पडल्याने संसार उघड्यावर आला आहे. या कुटुंबास आधार देण्यासाठी समाज सेवकांनी पुढे येण्याची गरज आहे.

दिंद्रुड येथिल विकास अशोक काटकर व आई नंदा अशोक काटकर हि दोघे आपल्या छोट्याशा घरट्यात राहतात. विकास हा अंध दिव्यांग तर त्याची आई वयोवृध्द अाहे. मोलमजुरी करुन उदरनिर्वाह करणाऱ्या काटकर परिवारावर मान्सून च्या पहिल्याच पावसात घर पडल्याने मोठे संकट ओढवले आहे. यात किराणा, भांडी, गॅस शेगडी, अन्नधान्य आदी साहित्याचे भिंत कोसळल्याने नुकसान झाले आहे. सामाजिक संस्थेने या कुटुंबास मदत करण्यासाठी पुढे येण्याची गरज आहे.

Exit mobile version