BEED24

पहिल्या दोन कोरोनाबाधीतांची वाजतगाजत सुट्टी 

बीड : येथील जिल्हा रुग्णालयात उपचार घेत असलेल्या  हिवरा व इटकूर येथील कोरोना बाधित रुग्णांची आज दि. २६ बुधवारी वाजतगाजत  सुट्टी करण्यात आली. कोरोनाची लढाई जिंकल्यामुळे त्यांचे मोठ्या उत्साही वातावरणात स्वागत करण्यात आले. यावेळी पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक थोरात आदींची उपस्थिती होती.

जिल्ह्यात दि.१६ मे रोजी मुंबईहून परतलेले नवीन कोरोना बाधित रुग्ण आढळून आले होते. या रुग्णांवर जिल्हा रुग्णालय बीड येथे उपचार सुरु होते. या रुग्णांवर उपचार होवून आज सूट्टी देण्यात आली.  ज्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला त्यांचा पोलीस पथकाने बँड वाजवत वाजत-गाजत स्वागत केले. शिवाय जिल्हा रुग्णालय परिसरात या रुग्णाने केक कापून आनंद व्यक्त केला. दरम्यान जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या ५५ झाली असून आज ४६ नवीन स्वॕब पाठवून दिले असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी राधाकिसन पवार यांनी दिली.

Exit mobile version