BEED24

पाच वर्षाच्या काशफ या बालिकेने केला रोजा

किल्लेधारूर दि.२७(वार्ताहर) येथील आझादनगर भागात राहणाऱ्या काशफ या पाच वर्षाच्या बालिकेने पवित्र रमजान महिन्यात आपल्या आयुष्यातील पहिला रोजा पुर्ण केल्याने तिचे अभिनंदन होत आहे.

इस्लाम धर्मात रमजान महिना अति पवित्र आहे. या महिन्यात इस्लामची मुख्य मुलतत्वापैकी रोजा ठेवण्यात येतो. वयाच्या सातव्या वर्षापासून वयस्कर व सुदृढ स्त्री पुरुषांना नमाज प्रमाणे रोजा अनिवार्य आहे. दि.२५ पासुन पवित्र रमजानच्या रोजा (उपवास) सुरु झाली आहेत. रोजा पहाटे पासुन सुर्यास्तापर्यंत जवळजवळ १४ तास अन्न व पाणी वज्र करुन यशस्वी केला जातो. शहरातील आझादनगर भागात राहणाऱ्या काशफ आयुब शेख या पाच वर्षाच्या बालिकेने आपल्या आयुष्यातील पहिला रोजा यशस्वीरीत्या पुर्ण केला. यामुळे तिचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

Exit mobile version