BEED24

पाच वर्षाच्या शगुफ्ताचा रोजा

किल्लेधारूर दि.२७(वार्ताहर) येथील बाराकमान भागात राहणाऱ्या शगुफ्ता या पाच वर्षाच्या बालिकेने पवित्र रमजान महिन्यात आपल्या आयुष्यातील पहिला रोजा पुर्ण केल्याने तिचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

इस्लाम धर्मात रमजान महिना अति पवित्र आहे. या महिन्यात इस्लामची मुख्य मुलतत्वापैकी एक रोजा हा सर्वजन ठेवतात. वयाच्या सातव्या वर्षापासून वयस्कर व सुदृढ स्त्री पुरुषांना नमाज प्रमाणे रोजा अनिवार्य आहे. पवित्र रमजानच्या रोजा (उपवास) ठेवण्यास सुरु झाली आहेत. रोजा पहाटे पासुन सुर्यास्तापर्यंत जवळजवळ १४ तास अन्न व पाणी वज्र करुन यशस्वी केला जातो. शहरातील बाराकमान भागात राहणाऱ्या शगुफ्ता जब्बार शेख (दखनी) या पाच वर्षाच्या बालिकेने आपल्या आयुष्यातील पहिला रोजा यशस्वीरीत्या पुर्ण केला. यामुळे तिचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

Exit mobile version