बीड दि.४(प्रतिनिधी) जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी काल दि.३ रोजी दिलेल्या नवीन आदेशानंतर स्थानिक प्रशासनाकडे पाससाठी झुंबड उडत होती. मात्र याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी खुलासा देत शिथिल वेळ सोडून काम करणाऱ्या साठी पास आवश्यक असल्याचे सोशल माध्यमातून आवाहन केले असून सर्वच दुकानदारांना पासची गरज नसल्याचे स्पष्ट केले आहे.
जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी सोशल माध्यमातून सकाळी सात ते साडेनऊ या वेळे व्यतिरिक्त काम करण्याची परवानगी असलेल्या दुकाने व व्यावसायिकांनाच पास आवश्यक आहे. अन्यथा, इतरांना हा पास घेण्याची आवश्यकता नाही असे आवाहन केले आहे. यामुळे सर्वच दुकानदारांना पासची गरज नसल्याचे स्पष्ट झाले आहे.