मुंबईः बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन व पुत्र अभिषेक यांना कोरोनाची लागण झाली आहे. बच्चन पिता पुत्र यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असून त्यांना मुंबईतील नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
काल बिग बी यांना सौम्य ताप आल्याने त्यांच्या सर्व तपासण्या करण्यात आल्या. यात कोरोना चाचणीही करण्यात आली. कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आल्यानंतर बच्चन कुटूंबातील जया बच्चन, अभिषेक व एश्वर्या यांच्याही तपासण्या करण्यात आल्या. यात अभिषेक यांची कोरोना चाचणी पॉझिटीव्ह तर जया व एश्वर्या यांचे अहवाल निगेटिव्ह आले. अमिताभ व अभिषेक बच्चन यांना नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आले असुन त्यांची प्रकृती ठिक असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान बच्चन यांच्या चाहत्याकडून त्यांच्या प्रकृतीसाठी प्रार्थना करण्यात येत आहेत.