किल्लेधारूर दि.२३(वार्ताहर) आज शहर व तालुक्यातील २१ लोकांचे थ्रोट स्वॅब अहवालाची प्रतिक्षा असून शहरातील बाधित रुग्णावर उपचार केलेल्या खाजगी दवाखान्यातील डॉक्टर व कर्मचाऱ्यांच्या अहवालाचा यात समावेश आहे. सहवासितांचे उर्वरित स्वॅब तपासणीसाठी अंबाजोगाई स्वा.रा.ति. प्रयोगशाळेत आज रात्री पाठवण्यात येणार असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सचिन शेकडे व वैद्यकीय अधिक्षक डॉ.चेतन आदमाने यांच्या कडून मिळाली.
बीड जिल्ह्यात सध्या कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत. आज जिल्ह्यात तब्बल ४४ पॉझिटीव्ह रुग्ण आढळली आहेत. काल धारुर शहरात एकास कोरोनाची लागण झाल्याचे निदर्शनास आले. या बाधितावर शहरात एका खाजगी दवाखान्यात उपचार करण्यात आले होते. या दवाखान्यातील डॉक्टरसह कर्मचाऱ्यांची स्वॅब काल पाठवण्यात आली आहेत. आज रात्री या २१ नमुन्याचे अहवाल येणार असून संध्याकाळी इतर सहवासितांचे स्वॅब तपासणी साठी पाठविण्यात येणार असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सचिन शेकडे व वैद्यकीय अधिक्षक डॉ.चेतन आदमाने यांच्या कडून मिळाली.
आपल्या परिसरातील बातम्या जास्तीत जास्त शेअर करा….