BEED24

मयत वृध्द पॉझिटीव्ह आल्याने ग्रामस्थांची पंचाईत; तालुक्यातील सहावा बळी

किल्लेधारूर दि.२७(वार्ताहर) तालुक्यातील गावंदरा येथे दि.२६ बुधवार रोजी मयत झालेल्या वृध्दाचा स्वॅब अहवाल पॉझिटीव्ह आल्यामुळे गुरुवारी अंत्यविधीस उपस्थित असलेल्या ग्रामस्थांची पंचाईत झाली असुन १०० ते १५० लोकांत भितीचे वातावरण आहे.

तालुक्यातील गांवदरा येथील एका ६२ वर्षीय वृध्दास आजारामुळे धारुर येथील खाजगी रुग्णालयात दि.२६ रोजी दाखल करण्यात आले होते. लक्षणांवरुन येथील स्वॅब कलेक्शन सेंटरवरुन सदरील वृध्दाचे थ्रोट स्वॅब तपासणीसाठी बुधवारी अंबाजोगाई प्रयोगशाळेत पाठवण्यात आले. प्राथमिक उपचार करुन वृध्दास गृह विलगीकरणाची सुचना देवून घरी पाठवण्यात आले होतृ. मात्र बुधवारी रात्री हृदयविकाराच्या धक्क्याने वृध्दाचे निधन झाले. आज गावात त्याचे अंत्यविधी करण्यात आला. सांयकाळी सदरील वृध्दाचा स्वॅब अहवाल पॉझिटीव्ह आल्याने आरोग्य विभागाने संबंधिताशी संपर्क केला. यावेळी सदरील इसम दगावल्याची माहिती समोर येवून १०० ते १५० लोक संपर्कात आल्याचा अंदाज आहे. यामुळे गांवदरा गावात दहशत पसरली असुन आरोग्य विभागाच्या वतीने ग्रामस्थांनी घाबरुन न जाता स्वंयस्फुर्तिने आपली तपासणी करण्यासाठी सहकार्य करावे व शासनाचे नियम पाळण्याचे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सचिन शेकडे यांनी केले. तालुक्यात सलग दोन दिवस झालेल्या मृत्यू मुळे कोरोना बळीची संख्या ६ झाली आहे.

Exit mobile version