BEED24

मी पाहिलेले देवदूत- हरिभाऊ मोरे…. असे आहे धारुरचे कोविड सेंटर…

किल्लेधारूर दि.२४ (वार्ताहर) कोरोनाच्या बाबतीत अनेकांच्या मनात भिती होती. या भितीने अनेकांचा जीवही घेतला. मात्र अनेकांना खरा आधार मिळाला तो कोविड सेंटरमधील कार्यरत डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांचा. दिवसेंदिवस रुग्ण संख्या वाढत असताना धारूर येथील कोविड सेंटर मध्ये रुग्णांना दिली जाणारी सेवा अतिशय उत्कृष्ट व नियोजनबध्द आहे. येथील कोविड सेंटरचे प्रमुख डॉ. चेतन आदमाने व डॉ. तफील तांबोळी हे रुग्णांसाठी देवदुत ठरत आहेत. कोरोना रोगाची भिती दुर करून रुग्णाच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण करण्याचे काम हि मंडळी करत आहे. धारुरचे कोविड सेंटर हे जिल्ह्यातील आदर्श कोविड सेंटर म्हणल्यास वावगे ठरणार नाही.

धारूर शहरात व तालूक्यात कोविड रुग्णांची संख्या गेल्या दिड महिन्यात झपाट्याने वाढत आहे. धारूर येथील कोविड सेंटरवर १०० बेड ची व्यवस्था व नियोजन होते. शहरात ॲटीजन टेस्ट मोहीम राबवल्यावर रुग्ण संख्येत अचानक मोठी वाढ झाली. शंभर पेक्षा जास्त झालेली रुग्ण संख्या आरोग्य विभागाची डोकेदुखी ठरत होती. रुग्णांना कोठे ठेवावे हा प्रश्न निर्माण झाला होता. धारूर येथील कोवीड सेंटर मध्ये शंभर रुग्ण संख्ये नुसार कर्मचारी होते. तेवढ्याच जनांच्या सुविधा होत्या. धारूर ग्रामीण रुग्णालयाचे अधिक्षक डॉ. चेतन आदमाने हे वैयक्तिक येथील सर्व बाबी कडे लक्ष ठेवून होते. ते दिवसात एकदा तरी सर्व रुग्णाची वैयक्तिक भेट घेऊन त्यांचे समाधान करतात. त्यांची भेट ही रुग्णाच्या मनावरील भिती चिंता दुर करून चेहऱ्या वर हास्य निर्माण करते. येथील सर्व सुविधा उपचार याकडे त्यांचे वैयक्तिक लक्ष असते. रुग्ण संख्या वाढल्यावर त्यांनी वरीष्ठांच्या परवानगीने आहे त्या कर्मचाऱ्यांचा आधार घेऊन १६० पेक्षा जास्त रुग्ण असताना त्यांना अपूऱ्या कर्मचाऱ्यांवर सर्व सुविधा व्यवस्थीत दिल्या. येथील कर्मचाऱ्यांना आपले पणाची भावना निर्माण करून त्यांना सन्मान पुर्वक वर्तणूक देऊन त्यांचे कडून काम करून घेतात. या सेंटर वरील सर्व व्यवस्था सांभाळणारे डॉ. तफील तांबोळी हे ही खऱ्या कोवीड यौध्याचे काम करत आहेत. रुग्णाच्या मनावरील तणाव दुर करून त्यांच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण करत आहेत. डॉ. सोनिया मुंडे, डॉ. तेजस्वीनी नेहरकर व त्यांचे इतर कर्मचारी उत्कृष्ट काम करत आहेत. त्या मुळे जिल्ह्यात हे कोविड सेंटर सर्व उत्कृष्ट कोविड सेंटर ठरत आहे. तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सचिन शेकडे यांनी धारुरच्या कोविड सेंटर बाबत प्रशंसा करत कोविड सेंटरसह पॉझिटीव्ह रुग्णाच्या संपर्क शोध मोहिमेत काम करणाऱ्या डॉ.लगड, डॉ. दुबे, डॉ. पुजदेकर, डॉ. शेख, डॉ. जाधव आदी डॉक्टरसह अधिपरिचारीका व आरोग्य कर्मचाऱ्यांचे कौतूक केले. धारुरचे कोविड सेंटरवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी कठीण परिस्थितीत मोलाची कामगिरी केल्याचेही त्यांनी सांगितले. येथे उपचार घेणारे व सुट्टी होऊन जाणारे रुग्ण येथील उपचार पध्दती डॉक्टर्स कडून मिळणारा प्रतीसाद व येथील सुविधा यांचे कौतूक करत आहेत.

डॉक्टर्स नव्हे देवदूतच — पञकार हरिभाऊ मोरे

धारूर येथे कोवीड सेंटर वर कोरोना झाल्यामुळे आपण उपचार घेतले. डॉ. चेतन आदमाने, डॉ. तफील तांबोळी, डॉ. मुंडे व कर्मचारी यांचे कडून रुग्णांना मिळणारी सेवा निश्चीतच सर्वोत्कृष्ट असून डॉक्टर्स हे देवदूतच आहेत याचा अनूभव मी स्वतः घेतला आहे. त्यांचे कौतुक करावे तेवढे कमी असे पञकार हरिभाऊ मोरे यांनी सांगीतले.

Exit mobile version