BEED24

मुंबईमध्ये ५३ पत्रकारांना कोरोनाचा संसर्ग.

मुंबई:  गेल्या आठवड्यात पत्रकार संघाने मुंबईतील पत्रकार आणि कॅमेरामन यांच्या कोरोना चाचणीसाठी कॅम्प आयोजित केला होता. यात घेण्यात आलेल्या १६८ चाचण्यापैकी मुंबईमध्ये ५३ पत्रकारांना कोरोनाचा संसर्ग झाला असल्याची माहिती समोर आलेली आहे.

गेल्या आठवड्यात एका वृत्तवाहिनीतील पत्रकाराला कोरोनाची लागण झाली होती. यानंतर खडबडून जागे झालेल्या  प्रशासनाकडून सर्व माध्यम प्रतिनिधीची तपासणी करण्यात आली होती. त्यामध्ये १६८ जणांची कोरोना चाचणी घेण्यात आली. रविवारी मिळालेल्या अहवालानुसार १६८ पैकी ५३ जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. सकाळी हा आकडा २१ होता आता तो ५३ वर पोहोचला आहे. कोरोनाचा संसर्ग झालेले बहुतांश पत्रकार इलेक्ट्रॉनिक मीडियातील आहेत. बृहन्मुंबई  महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाचे अधिकारी अमेय घोले यांनी दिलेल्या माहितीनुसार १६७ पत्रकांराच्या चाचण्या घेण्यात आल्या आहेत. त्यापैकी ५३ जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. या सर्वांना क्वारंटाईन करण्यात येणार आहे. अद्याप काही पत्रकारांच्या चाचणीचा अहवाल येणे बाकी आहे. त्यामुळे ही आकडेवारी आणखी वाढण्याची शक्यता आहे.

Exit mobile version