BEED24

या डॉक्टरवर पुन्हा कारवाई….

परळी दि.६(प्रतिनिधी) अवैध गर्भपाताच्या गुन्ह्यात जामिनावर आलेल्या डॉ. सुदाम मुंडे यांनी बेकायदेशीरपणे दवाखाना सुरु ठेवला. याची कुणकुण लागल्यानंतर जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या निर्देशानुसार आरोग्य विभागाने पोलिसांच्या मदतीने शनिवारी मध्यरात्री सदरील दवाखान्यावर छापा मारला.

२०१२ सालच्या अवैध गर्भपात प्रकरणी बीड जिल्हा न्यायालयाने सुदाम मुंडेला पत्नी सरस्वतीसह दोषी ठरवून दहा वर्षांची शिक्षा सुनावली आहे. परंतु, ही शिक्षा भोगत असताना काही महिन्यापूर्वी त्याला सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मिळाला होता. जामिनावर बाहेर आल्यानंतर परळीजवळ  बेकायदेशीरपणे त्याचा दवाखाना सुरु असल्याची माहिती आरोग्य विभागाला मिळाली. जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी निर्देश दिल्यानंतर आरोग्य  विभागाकडून मध्यरात्रीपासून पहाटेपर्यंत तब्बल सहा ते सात तास ही कारवाई करण्यात आली. यावेळी गर्भपातासाठी आवाश्यक असणारे काही संशयास्पद साहित्य आणि औषधी सापडली असल्याची प्राथमिक माहिती आहे. याप्रकरणी  सुदाम मुंडे यांना पोलीस ठाण्यात नेण्यात आले असून त्याची चौकशी सुरु आहे.

Exit mobile version