BEED24

रमजान ईद च्या निमित्ताने गरजू मुस्लिम बांधवांना जिवनावश्यक किट चे वितरण

किल्लेधारूर दि.२३(वार्ताहर) रमजान ईद च्या निमित्ताने गरीब गरजु मुस्लीम बांधवांना कायाकल्प फाऊंडेशन किल्लेधारूर च्या वतीने जिवनावश्यक किट चे वितरण करण्यात आले.

कोरोना मुळे या काळात साजरे होणारे गुडीपाडव, अक्षय तृतीया, रामनवमी सण तर, भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती ही साध्या पध्दतीने साजरी करण्यात आली. आता मुस्लीम बांधवांचा सर्वात मोठा सण रमजान ईद ही याच काळात आला आहे. गोर गरीब, मजुरांचे रोजगार बंद असल्याने हे तो सण कसा साजरा करायचा असा प्रश्न उपस्थित झाला आहे. अश्याच काही किल्लेधारूर शहरातील मुस्लीम गरजू , मंजूर, कुटूंबाना कायाकल्प फाऊंडेशनच्या वतीने प्राथमिक स्वरूपात २१ कुटूंबना जिवनवाश्यक किट वाटप करण्यात आले. या किट मध्ये रमजान ईद चा सण साजरा करण्यासाठी लागणारे किरणा साहित्य चा समावेश करण्यात आलेला आहे. यावेळी मराठी पत्रकार परिषद प्रसिद्धी प्रमुख अनिल महाजन, जलदुत विजय शिनगारे, पत्रकार नाथा ढगे, इरफान शेख, सतीश पोतदार, कायाकल्प फाऊंडेशन अध्यक्ष दिनेश कापसे, कायाकल्प सचिव विश्वानद तोष्णीवाल, दत्ता गोंदणे, शिवानंद तोष्णीवाल, श्याम तोष्णीवाल हे उपस्थित होते.

Exit mobile version