BEED24

रुईधारूर येथे ४३ युवकांनी केले रक्तदान

किल्लेधारूर दि.२७ (वार्ताहर ) तालूक्यातील रुईधारूर येथील युवकांनी पुढाकार घेऊन आयोजीत केलेल्या रक्तदान शिबीरास उस्फूर्त प्रतीसाद मिळाला. या शिबीरात ४३  रक्तदात्यानी रक्तदान केले.


मौजे रुई धारूर येथे गावातील युवक अजित जोशी याच्या पुढाकाराने सर्व मित्र परिवाराने शासनाच्या हाकेला प्रतिसाद देत रक्त दान शिबिराचे आयोजन केले होते. कोरोना या आजाराने घातलेल्या थैमानाच्या पार्श्वभूमीवर रक्ताची कमतरता भासत असताना रुई येथील युवकांनी या रक्तदान शिबीराचे आयोजन जिल्हा परिषद प्रा शाळा रुई धारूर या ठिकाणी केले होते. कुठलाही गाजावाजा न करता व सोशल डिस्टसन्स चे सर्व नियम पाळून सॕनीटायझर चा वापर करून सर्व प्रकारची काळजी घेऊन ४३ जणांनी रक्तदान केले. यात अजित जोशी, अविनाश तिडके, अमोल तिडके, नितीन तिडके, राम तिडके, बाळासाहेब तिडके , सुधीर भोसले, भास्कर तिडके ,रामेश्वर तिडके सह सर्वांनी रक्तदान केले. या शिबीरास उस्फूर्त प्रतीसाद मिळाला. युवकांच्या या उपक्रमाचे गावात कौतूक होत आहे.

Exit mobile version