BEED24

वधू-वराच्या आई वडिलांसह भटजीवर गुन्हा

गेवराई दि.१७ (प्रतिनिधी):- अल्पवयीन मुलीचा मंदिरामध्ये जावून गुपचूप विवाह लावून दिला तसेच विवाहामध्ये उपस्थिती दर्शवली. या प्रकरणी वधूवरांच्या आई, वडील, भटजीसह चाळीस वर्‍हाडी मंडळीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरील प्रकार गेवराई तालुक्यातील देवपिंप्री येथे घडला.

गेवराई येथील एका अल्पवयीन मुलीचा दि.११ गुरुवार रोजी सकाळी ८ च्या सुमारास देवप्रिंपी येथील डोंगरावर महादेवाच्या मंदिरामध्ये विवाह झाला. याची माहिती ग्रामसेवक रोहिणीकांत घसिंग यांना झाल्यानंतर त्यांनी मंगळवारी गेवराई पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. या प्रकरणी बालविवाह प्रतिबंधक अधिनियम २००७ कायद्यानूसार  सतिष खनाळ, सुनिता खनाळ, सुंदर खनाळ, लहू मंचरे, शिवाजी मंचरे, मंदाबाई मंचरे, अंकुश मंचरे, गोपिनाथ मंचरे यांच्यासह अज्ञात भटजी व तीस ते चाळीस वर्‍हाडी मंडळींवर गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरिक्षक टाकसाळ हे करत आहेत. तब्बल पाच दिवसांनंतर कारवाई झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

Exit mobile version