BEED24

वसंत कुंभार यांचे निधन; कोरोनाचा तिसरा बळी;

किल्लेधारूर दि.२०(वार्ताहर) शहरातील प्रतिष्ठित सराफा व्यापारी वसंत मारुतीराव कुंभार (६७) यांचे आज पहाटे अंबाजोगाई येथे कोरोनावर उपचार सुरु असताना निधन झाले.

गेल्या आठ दिवसांपुर्वी प्रकृती अस्वस्थ असल्यामुळे त्यांना अंबाजोगाई येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांची कोविड-१९ चाचणी पॉझिटीव्ह आली होती. सतत आठ दिवस उपचार सुरु असताना आज त्यांची प्राणज्योत मावळली. वसंत कुंभार हे येथील प्रतिष्ठित सराफ व्यवसायिक होते. येथील सरस्वती ज्ञानप्रसारक शिक्षण संस्थेचे संचालक तर काही काळ विशेष कार्यकारी अधिकारी होते. त्यांच्या पश्चात एक मुलगा, सुना, नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने धारुरकरांत हळहळ व्यक्त होत आहे.

Exit mobile version