BEED24

शरद पवार यांच्या “सिल्वर ओक” वर कोरोना

मुंबईः दि.१७ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबई येथील निवासस्थान असलेल्या “सिल्वर ओक” वर कोरोनाने धडक मारली असुन या ठिकाणच्या सहा कर्मचाऱ्यांना कोरोना लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. यामुळे स्वतः शरद पवार व त्यांच्या कुटूंबातील सदस्यांची ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये कोरोना चाचणी करण्यात आली. पवार यांची चाचणी निगेटिव्ह आल्याचे राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी माध्यमा समोर माहिती दिली. पॉझिटीव्ह येणाऱ्या मध्ये सुरक्षा रक्षक, स्वंयपाकी व एका स्विय सहाय्यकाचा समावेश आहे. यामुळे शरद पवार यांनी आपले सर्व कार्यक्रम रद्द केले असुन चार दिवस कोणत्याही व्यक्तीस भेटणार नसल्याचे जाहीर केले आहे. खबरदारीचा उपाय म्हणून परिसरात तापीचे रुग्ण तपासणी व कोरोना चाचणी करण्यात येणार असल्याचे आरोग्य विभागाकडून स्पष्ट करण्यात आले.

Exit mobile version