BEED24

शाळा भरवत नाही म्हणून लिपिकास मारहाण!

केजः तालुक्यातील विडा येथे एका शाळेतील कनिष्ठ लिपिकास एकाने शिवीगाळ करून मारहाण केल्या प्रकरणी शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल झाला आहे.

अधिक माहिती अशी की,  दि.२९ जुलै रोजी दुपारी ४:३० वा. केज तालुक्यातील विडा येथील हनुमान विद्यालयातील कनिष्ठ लिपिक बापुराव रामराव देशमुख (४५) हे कार्यालयीन कामकाज करीत असताना साजन दगडु वाघमारे याने तुम्ही शाळा का भरवित नाहीत? असे म्हणत शिविगाळ करूण चापटाबुक्कयाने मारहाण केली. तसेच हातामध्ये दगड धरुन डाव्या कोपरावर मारुन मुक्का मार दिला, आणि तू नौकरी कशी करतोस? असे म्हणून शासकीय कामात अडथळा आणला.

या प्रकरणी बापूराव देशमुख यांच्या फिर्यादी वरून साजन वाघमारे यांच्या विरोधात केज पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक श्रीराम काळे हे पुढील तपास करीत आहेत.

Exit mobile version