किल्लेधारूर दि.२०(वार्ताहर) बीड जिल्ह्यातील सर्व मुस्लिम बांधवांना आत्तापर्यंत लॉक डाऊन मध्ये ज्या पद्धतीने प्रशासनाला सहकार्य केले आहे त्याचप्रमाणे रमजान महिन्यांमध्ये मुस्लिम समाजाने प्रशासनाला सहकार्य करावे व शासनाच्या निर्देशाप्रमाणे नमाज, रोजा व इफ्तार घरातच करावे असे आवाहन इंजि. सादिक इनामदार यांनी केले.
आपण आपल्या घरी सुरक्षित रहा व आपल्या घरीच नमाज पठण तरावी ची नमाज घरीच पठण करा व कोरोना सारख्या भयंकर रोगापासून देशाला वाचवण्याची दुवा करा. तसेच सर्व मस्जिद चे धर्मगुरू यांनी आपल्या आपल्या परिसरामध्ये घरामध्ये नमाज पडण्याचे आव्हान करा व प्रशासनाला सहकार्य करा.
रमजानच्या महिन्यामध्ये कोणीही शासनाच्या आदेशाचे उल्लंघन करू नये. आतापर्यंत सहकार्य केल्याप्रमाणे घरातच नमाज अदा करा ईफ्तार व तरावीची नमाज साठी एकत्रित येऊ नका आपल्या कुटुंबियासह घरातच इफ्तार करा. इफ्तार च्या खरेदीसाठी कोणीही घराबाहेर पडू नये सध्या ज्याप्रमाणे भाजीपाला प्रत्येक भागामध्ये वाहना मध्ये पोहोच केला जात आहे. त्याचप्रमाणे रमजानमध्ये ही घरपोच भाजीपाल्याचे नियोजन शासनामार्फत करण्यात आले आहे. त्यांच्यापासूनच खरेदी करा असे आवाहन इंजिनीयर सादिक इनामदार यांनी मार्फत केले आहे.