BEED24

“शिवराज्याभिषेक दिन” अनोख्या पध्दतीने साजरा

किल्लेधारूर दि.६ (वार्ताहर) येथील कसबा विभागात छञपती शिवाजी महाराजाचे राज्यभिषेक दिनाचा सोहळा अनोख्या पध्दतीने साजरा करत नगरपालीकेचे राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेत्या उज्वला सुधिर शिनगारे यांनी आदर्श पायंडा घातला. प्रभागातील १५० गरजू कुंटूंबाना जिवनावश्यक वस्तूचे वितरण मान्यवराचे उपस्थीतीत करुन शिवराज्यभिषेक दिन वेगळ्या पध्दतीने साजरा केल्यामुळे त्यांचे सर्वत्र कौतूक होत आहे.

धारूर येथे कसबा विभागात छञपती शिवाजी महाराज राज्यभिषेक दिना निमीत्त गरजू व गरीब कुंटूंबाना जिवनवाश्यक वस्तूचे १५० किट वितरणाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. या वेळी प्रथम उपस्थित मान्यवराच्या हस्ते छञपती शिवाजी महाराजाचे प्रतीमेचे पुजन करण्यात आले. यावेळी तहसिलदार वंदना शिडोळकर, पोलीस निरीक्षक सुरेखा धस, नायब तहसीलदार सुहास हजारे, उद्योजक माजी नगराध्यक्ष माधवराव निर्मळ, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष नितीन शिनगारे, सेवा सोसायटीचे संचालक सुधिर शिनगारे, मुख्यध्यापिका सिमा शिनगारे, ॲड.परमेश्वर शिनगारे आदी उपस्थीत होते. यावेळी प्रातिनिधीक स्वरूपात दहा जनांना मान्यवराचे हस्ते जिवनावश्यक वस्तुचे किट देण्यात आले. प्रभागातील इतर गरजूना घरपोच वितरण करण्यात आले. या उपक्रमाचे सर्वञ कौतूक होत असून आगळ्या वेगळ्या पध्दतीने हा दिन साजरा करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रताप शिनगारे, अविनाश ठोंबरे, शरद शिनगारे, प्रशांत शिनगारे, सचिन शिनगारे यांनी परिश्रम घेतले.

Exit mobile version