BEED24

शेतकऱ्यांचा कापुस सरसकट खरेदी करुन जूनी थकबाकी अदा करण्याची मागणी

किल्लेधारूर दि.५(वार्ताहर) शेतकऱ्यांचा कापुस सरसकट खरेदी करुन जानेवारी महिन्यात टाकलेल्या कापसाची थकबाकी तात्काळ अदा करण्याची मागणी भारतीय राष्ट्रीय युवक काँग्रेसचे माजलगाव मतदारसंघ अध्यक्ष आशोक तिडके यांनी निवेदनाद्वारे तहसीलदार वंदना शिडोळकर यांच्याकडे केली आहे.

कोरोना व लहरी हवामानामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. यात शासन शेतकऱ्यांचा कापुस ठराविक एका दर्जाचाच वेगवेगळ्या नियम व अटी लावून खरेदी करत आहे. अनेक शेतकऱ्यांना जानेवारी महिन्यात खरेदी केलेल्या कापसाचे पैसे अद्याप मिळालेली नाहीत. याबाबतीत माजलगाव मतदारसंघ युवक काँग्रेसच्या वतीने अध्यक्ष आशोक तिडके यांनी निवेदन देत विनाअट कापुस खरेदी व जूने कापुस खरेदीचे पैसे तात्काळ देण्याची मागणी केली आहे. शेवटी निवेदनात दि.११ सोमवारी आमरण उपोषणास बसण्याचा इशाराही दिला आहे. प्रशासनाच्या वतीने नायब तहसीलदार सुहास हजारे यांनी निवेदन स्विकारले.  निवेदनाच्या प्रति कृषि मंत्री विश्वजीत कदम, आ.प्रकाश सोळंके, बीड जिल्हाधिकारी, काँग्रेस चे जिल्हाध्यक्ष राजकिशोर पापा मोदी व पोलिस निरिक्षक धारुर यांना देण्यात आल्या आहेत.

Exit mobile version