BEED24

सकाळी सात वाजल्यापासुन दर दोन तासाला बस सुटणार

किल्लेधारूर दि.५(वार्ताहर) येथील बस स्थानकातून जिल्हा अंतर्गत प्रवासी वाहतूकीसाठी दर दोन तासाला प्रविशांच्या सोयीसाठी बस सुटणार असल्याची माहिती आगार प्रमुख शंकर स्वामी यांनी दिली.

राज्य परिवहन विभागाने सुरु केलेल्या बस सेवेस काही प्रमाणात प्रवाशांचा प्रतिसाद मिळण्यास सुरुवात झाली आहे. यामुळे आगार व्यवस्थापनाकडून यात सुत्रबध्दता आणत बस फेऱ्यांचे प्रत्येक दोन तासाचे नियोजन करण्यात आले आहे. सकाळी सात पासुन बस फेऱ्या सुरु होवून दर दोन तासाला एक बस याप्रमाणे बस रस्त्यावर धावणार आहे. तर शेवटची बस सांयकाळी ५.३० वाजता नियोजित गावाकडे धावेल. सदरील बससेवा ही बीड, अंबाजोगाई व केजसाठी राहणार असल्याचे आगार व्यवस्थापक शंकर स्वामी, भारत कोमटवार, अजय सोनटक्के यांनी माहिती दिली.

Exit mobile version