किल्लेधारूर दि.६(वार्ताहर) आज शहरात पॉझिटीव्ह येणाऱ्या रुग्णांची संख्या कमी असून काल केवळ एक स्वॅब पाठवण्यात आला होता. त्याचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे तर ॲन्टीजन तपासणीत आज नवीन ३ रुग्ण असे एकुण ४ पॉझिटीव्ह आढळून आली आहेत. आज ७३ जनांच्या ॲन्टीजन तपासणी केली असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सचिन शेकडे यांनी दिली.
सध्या आरोग्य विभागाच्या नवीन निर्देशानुसार लक्षणे नसणाऱ्या व्यक्तीच्या ॲन्टीजन तपासणी करण्यावर भर देण्यात आला आहे. ॲन्टीजन चाचणीत काल ४ तर आज ३ जन पॉझिटीव्ह आढळून आली आहेत. काल येथील कोविड सेंटर मधून शहरातील केवळ एक स्वॅब नमुना पाठवण्यात आला होता. त्याचा अहवाल प्राप्त झाला असून तो पॉझिटीव्ह आला आहे. असे एकुण ४ पॉझिटीव्ह रुग्णांची भर पडली आहे. आज आढळून आलेल्या ॲन्टीजन चाचणीत पांगरी येथील एक तर तेलगाव येथील दोघांचा समावेश आहे. यातील एक अंबाजोगाई तर एक माजलगाव येथील ॲन्टीजन तपासणीत पॉझिटीव्ह आला असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सचिन शेकडे यांनी दिली.