BEED24

सराफा असोसिऐशनकडून कोविड सेंटरमधील कर्मचाऱ्यांचे कौतूक

माजलगाव दि.२३(प्रतिनिधी) माजलगाव येथील सराफा असोसिऐशन च्या वतीने कोरोना रुग्णांची काळजी घेवून उपचार करणाऱ्या कोविड सेंटरवरील डॉक्टर व कर्मचाऱ्यांचे कौतूक करुन भविष्यात या कंत्राटी कर्मचाऱ्यांना शासनाने सेवेत कायम करण्यासाठी शासनाकडे प्रयत्न करु असे आश्वासन जि.प. समाजकल्याण सभापती कल्याण आबुज व सराफा असोशिऐशन कडून देण्यात आले.

जगात सध्या कोराना या आजाराने थैमाण घातले आहे. अनेक लोकांचा जिव कोराना या आजाराने गेला आहे. या परिस्थिती मध्ये स्वतः चा जीव धोक्यात घालून कोविड सेटंर मधील डॉक्टर व तेथील कर्मचारी रुग्णांना उपचार देण्यासाठी प्रयत्नशील आहेत. माजलगांव कोविड सेटंर मधील सर्व डॉक्टर व स्टाफचे काम अतिशय अभिमानास्पद आहे. त्यांच्या या कामाचे कुठेतरी कौतुक झाले पाहिजे म्हणून माजलगांव मधील सराफा असोसिएशनने कोविड सेटंर मधील डॉक्टर व स्टाफ यांच्या सत्काराचे आयोजन केले होते. यावेळी जिल्हा परिषदेचे समाजकल्याण सभापती कल्याण आबुज, असोसिएशन चे अध्यक्ष रामराजे राजंवण, नारायणराव सातपुते, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. परदेशी साहेब, ग्रामीण रुग्णालयाचे कर्तव्य दक्ष डॉक्टर रूद्रवार साहेब, कोविड सेटंर मध्ये काम करणारे ईतर डॉक्टर व स्टाफसह सराफा बाधंव उपस्थित होते. कोविड सेटंर मध्ये डॉक्टर व ईतर स्टाफ कत्रांटी पध्दतीवर काम करत आहेत. स्वतः ची पर्वा न करता हि सगळे लोक कोराना झालेल्या रुग्णांना सेवा देत आहेत. अतिशय जोखमीचे काम ते करत आहेत. या लोकांना शासनाने सेवेमध्ये कायम केले पाहिजे याबाबत आमदार प्रकाशदादा सोळंके यांच्या माध्यमातून आरोग्य मंत्री राजेश टोपे व राज्य शासनाकडे आम्ही पाठपुरावा करू असे आश्वासन यावेळी सभापती आबुज व सराफा असोसिऐशन च्या वतीने देण्यात आले.

Exit mobile version