BEED24

सलग दुसऱ्या दिवशीही प्रेत तहसील कार्यालयात; आज थेट तहसीलदार दालनासमोर

किल्लेधारूर दि.२७(वार्ताहर) येथील लिंगायत समाजाच्या स्मशानभुमीला जाणाऱ्या रस्त्याच्या प्रश्नावर आज सलग दुसऱ्या दिवशीही प्रेतयात्रा तहसील कार्यालयात थेट तहसीलदार यांच्या दालना समोर नेण्यात आल्याची घटना घडली.

शहरातील लिंगायत समाजाची स्मशानभुमीच्या रस्त्याचा प्रश्न आज दुसऱ्या दिवशीही ऐरणीवर आला. काल दि.२७ गुरुवार रोजी तहसील कार्यालयात प्रेतयात्रा नेल्यानंतर नायब तहसीलदार रामेश्वर स्वामी यांनी आंदोलकांची समज काढून प्रकरण तुर्त शांत करत येत्या ३१ अॉगस्ट पर्यंत स्मशानभुमीचा रस्ता मोकळा करुन देण्याचे आश्वासन दिले होते. परंतू आज पुन्हा तोच प्रकार पहावयास मिळाला. यापुर्वीही असाच प्रकार घडलेला आहे. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असल्याने तहसीलदार वंदना शिडोळकर यांनी पोलिसांना पाचारण केले. सहाय्यक पोलिस निरिक्षक सुरेखा धस पोलिस ताफ्यासह तहसील कार्यालयात पोहोचल्या असून रस्त्याच्या प्रश्नावर तोडगा काढण्याचा प्रयत्न सुरु आहे.

Exit mobile version