BEED24

सहा वर्षाच्या हुजेफचा रोजा

माजलगाव दि.११(वार्ताहर) माजलगाव येथे राहणाऱ्या हुजेफ आसद शेख या सहा वर्षाच्या बालकाने पवित्र रमजान महिन्यात आपल्या आयुष्यातील पहिला रोजा पुर्ण केल्याने त्याचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

इस्लाम धर्मात रमजान महिना अति पवित्र आहे. या महिन्यात इस्लामची मुख्य मुलतत्वापैकी एक रोजा हा सर्वजन ठेवतात. वयाच्या सातव्या वर्षापासून वयस्कर व सुदृढ स्त्री पुरुषांना नमाज प्रमाणे रोजा अनिवार्य आहे. पवित्र रमजानच्या रोजा (उपवास) ठेवण्यास सुरु झाली आहेत. रोजा पहाटे पासुन सुर्यास्तापर्यंत जवळजवळ १४ तास अन्न व पाणी वज्र करुन यशस्वी केला जातो. शहरातील हुझेफ आसद शेख  या सहा वर्षाच्या बालकाने आपल्या आयुष्यातील पहिला रोजा यशस्वीरीत्या पुर्ण केला. हुजेफ हा येथील एआयएमआयएमचे शहराध्यक्ष शेख आसद यांचा मुलगा तर एमआयएमचे माजलगाव मतदारसंघाचे प्रभारी  शेख सिद्दीक यांचा पुतण्या आहे. त्याचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

Exit mobile version