भोपाल दि.९(वि.प्र) ज्योतिरादित्य आणि त्यांची आई कोरोना पॉजिटिव आले असून दिल्ली येथील रुग्णालयात भर्ती करण्यात आले असल्याची माहिती सुत्राकडून मिळाली आहे. परिवारातील इतर तीन सदस्यांचे रिपोर्ट मात्र निगेटिव्ह आली आहेत.
ज्योतिरादित्य सिंधिया व त्यांची आई माधवी राजे या पाच दिवसांपुर्वी आजारपणाचे लक्षण असल्याने रुग्णालयात दाखल होते. सूत्रांनुसार मंगळवारी ज्योतिरादित्य, आई माधवी राजे, पत्नी प्रियदर्शिनी, मुलगा महाआर्यमन आणि मुलगी अनन्या यांची कोरोना टेस्ट घेण्यात आली होती. प्रियदर्शनी व मुला मुलीचे रिपोर्ट निगेटिव आली, तर ज्योतिरादित्य आणि त्यांच्या आई चे रिपोर्ट पॉजिटिव आली आहेत. दिल्ली येथील मैक्स हॉस्पिटलमध्ये त्यांच्या वर उपचार सुरु आहेत. सिंधिया परिवाराच्या वतीने अधिकृत घोषित करण्यात आलेले नाही. अनेक राजकीय व्यक्तीने ज्योतिरादित्य व माधवी राजे यांच्यात लवकर सुधारणा होण्यासाठी प्रार्थना केली आहे.