BEED24

सोमवारी रक्तदान शिबीराचे आयोजन

किल्लेधारूर दि.२५(वार्ताहर) कोरोना विषाणू संसर्गामुळे देशभरात गरजूंना रक्ताचा तुटवडा जाणवत असल्याने “किल्ले धारूर पत्रकार व किल्ले धारूर पोलिस स्टेशन” च्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन सोमवार दि.२७ रोजी करण्यात आले आहे.

या महामारीच्या काळात गरजूंना रक्ताची आवश्यकता असल्याने शहरातून जास्तीत जास्त युवकांनी, नागरिकांनी रक्तदान करण्यासाठी खालील मोबाईल वर संपर्क साधुन रक्तदान करु इच्छिणाऱ्या रक्तदात्यांनी आपल्या नावाची नोंद करावी असे आवाहन करण्यात येत आहे. हे रक्तदान शिबीर सर्व शासकीय नियमांचे पालन करुन व सोशल डिस्टन्स पालन करून पार पाडण्यात येणार आहे. दि.२७ सोमवार रोजी सकाळी १० ते २ यावेळात ग्रामीण रुग्णालय किल्ले धारूर येथे हे रक्तदान शिबीर होणार आहे. या शिबीरात सहभागी होण्यासाठी रक्तदात्यांनी 9422659710, 9975441494, 8485858222, 9423692818 या मोबाईल क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन पोलिस व पत्रकारांकडून करण्यात आले आहे.

Exit mobile version