BEED24

३० हजारांची अवैद्य देशी दारु जप्त, दिंद्रुड पोलिसांची कारवाई


दिंद्रुड दि.१५(प्रतिनिधी) माजलगाव तालुक्यातील दिंद्रुड पोलीस हद्दीत अवैद्य देशी दारू गुपित माहितीच्या आधारे दिंद्रुड पोलीसांनी रविवारी सायंकाळी पकडुन जप्त केली. तिस हजार रुपयांचा मुद्दे माल याप्रसंगी जप्त करण्यात आला असुन दिंद्रुड पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला.

अधिक वृत्त असे की, दिंद्रुड पोलीस हद्दीतील तेलगाव शिवारात एका पञ्याच्या शेडमध्ये अवैधरित्या देशी दारू असल्याची गुप्त माहिती मिळाल्यावरून दिंद्रुड पोलीस स्टेशनचे सपोनि अनिल गव्हाणकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक विठ्ठल शिंदे व विजेंद्र नाचण सह सहकाऱ्यांनी रविवारी सायंकाळच्या वेळी मोठ्या शिताफीने देशी दारू असलेल्या पञ्याच्या शेडमध्ये छापा टाकत देशी दारूचे २९९५२/- रुपये किंमतीचे १२ बाॅक्स जप्त केले. याबाबत पोलिस उपनिरीक्षक विजेंद्र नाचण यांच्या फिर्यादी वरुन विक्रेता समाधान गायकवाड याच्या विरूध्द गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईने अवैधरित्या दारू विक्री करणारांचे धाबे दणाणले आहेत. ही कारवाई करण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार, अप्पर पोलिस अधीक्षक श्रीमती स्वाती भोर, पोलिस उपअधिक्षक श्रीकांत ढिसले सपोनि अनिल गव्हाणकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक विठ्ठल शिंदे व विजेंद्र नाचण यांच्यासह पो.काॅ. संतोष बदने, पो.काॅ. संतोष सरवदे, पो.काॅ. विशाल मुजमुले, चालक युनुस शेख आदिंनी ही कारवाई केली.

Exit mobile version