BEED24

७५ दिवसांनी उघडली धार्मिक स्थळांची दारे

दिल्ली दि.८(वि.प्र.) देशभरात आज ७५ दिवसांनी मंदिर, मस्जिद व गुरुद्वारा सारख्या धार्मिक स्थळांची द्वारे काही अटींवर उघडली आहेत. मात्र महाराष्ट्र व झारखंडमध्ये धार्मिक स्थळ बंदच राहणार आहेत.

कोविड १९ चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभर केंद्र सरकारने आपत्ती व्यवस्थापन कायदा लागु केला होता. याकाळात सर्व धार्मिक स्थळ सामान्य जनतेसाठी बंद करण्यात आली होती. मिशन बिगिन अगेन अंतर्गत आज पासुन अनेक नियम शिथिल करण्यात येत आहेत. त्यापैकी एक ७५ दिवसांनी कोरोनापासुन बचाव करणाऱ्या नियमांचे बंधन घालून धार्मिक स्थळ सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला. यात मंदिरात सोशल डिस्टंट पाळणे, घंटा वाजवण्यास बंदी, मुर्ति स्पर्श बंदी, टिळा लावण्यास बंदी, जमाव करण्यास बंदी, मास्क लावणे अनिवार्य, प्रसाद चढावा बंदी, गोव्यातील ९ मंदिर आजही बंद तर कर्नाटकातील मंदिर १३ जून पासुन उघडणार, दिल्ली बॉर्डर आज पासुन खुली, महाराष्ट्र व झारखंडमध्ये बंदच. मथूरा व भोपालमध्येही बंदच. ३० जूनपर्यंत वैष्णोदेवी दर्शन नाही. मशिदीत वजू करण्यास बंदी, घरुन जाई नमाज घेवून जाणे, मशिदीतील स्वच्छता गृह बंद, फक्त फर्ज नमाज ठराविक अंतर ठेवून अदा करण्यास परवानगी, मास्क लावणे बंधनकारक, मशिदीतील वस्तू वापरण्यास बंदी, ६५ पेक्षा जास्त व १० पेक्षा कमी वयाच्या व्यक्तीस बंदी. अशाच स्वरुपाचे बंधन गुरुद्वारा व चर्च मध्ये लागू असणार आहेत. देशभर अनलॉक होण्यास सुरुवात करण्यात आली असली तरी महाराष्ट्र व झारखंडमध्ये मात्र धार्मिक स्थळ बंदच राहणार आहेत.

Exit mobile version