किल्लेधारूर दि.१९(वार्ताहर) जिल्ह्यात आज दुसऱ्या दिवशी पाच शहरात व्यापाऱ्यांची ॲन्टीजन टेस्ट करण्यात आली. या ॲन्टीजन टेस्टमध्ये १८० पॉझिटीव्ह आढळली आहेत. धारुर येथील कोविड केअर सेंटरमध्ये पोलिसांच्या ॲन्टीजन टेस्ट करण्यात आल्या. त्या सर्व निगेटिव्ह आल्यामुळे धारुरच्या पोलिसांना दिलासा मिळाला. काल धारुरचे ३७ लोकांचे थ्रोट स्वॅब अंबाजोगाई प्रयोगशाळेत पाठवण्यात आली आहेत. आज रात्री त्यांचा अहवाल प्राप्त होणार आहे.
धारुर शहरात काल सर्वाधिक पॉझिटीव्ह रुग्ण आढळून आलेत. जिल्हा पोलिस अधिक्षकांच्या सुचनेवरुन येथील सर्व पोलिसांची ॲन्टीजन टेस्ट करण्यात येत आहे. आज २५ कर्मचाऱ्यांची टेस्ट पुर्ण झाली असुन उर्वरित कर्मचारी व होमगार्ड यांची टेस्ट उद्या करण्यात येणार आहे. काल येथील कोविड केअर सेंटरमधून अंबाजोगाई प्रयोगशाळेत ३७ लोकांचे स्वॅब पाठवण्यात आले आहेत. या स्वॅबचे अहवाल आज रात्री प्राप्त होणार आहेत. जिल्ह्यात लॉकडाऊन असलेल्या माजलगाव, परळी, केज, आष्टी व अंबाजोगाई शहरात आज दुसऱ्या दिवशी व्यापाऱ्यांची ॲन्टीजन टेस्ट करण्यात आल्या. यात १८० व्यापारी पॉझिटीव्ह आढळली आहेत. माजलगाव येथील ॲन्टीजन तपासणी केंद्रावर आ.प्रकाशदादा सोळंके यांनी भेटी देत विचारपुस केली. ॲन्टीजन टेस्टमध्ये परळीत ६४, माजलगाव २६, केज १७, अंबाजोगाई ४० तर आष्टीत ३३ अशी १८० पॉझिटीव्ह रुग्ण आढळून आली. काल हा आकडा २१० होता.