BEED24

105 वर्षांचे आजोबा अन् 95 वर्षांच्या आजीनें केली कोरोनावर मात; लातूर जिल्ह्यातील सकारात्मक घटना.

लातूर दि.25 एप्रिल – सध्या महाराष्ट्रासह देशभरात कोरोना विषाणू (Corona Virus) संसर्गाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार माजवला आहे. दररोज मन हेलावून टाकणाऱ्या घटना घडत असुन मरण किती स्वस्त झाले ते उघड्या डोळ्यांनी पहायला मिळत आहे. यातच भयभीत झालेल्या या वातावरणात सकरात्मक घटना लातूर (Latur) जिल्ह्यात दिसुन आली. येथील एका वयाची शतकी पार केलेल्या दाम्पंत्याने कोरोनाला मात देवून इतरांना संदेश दिला आहे. रुग्णालयातील विदारक दृश्य पाहून वेदना आणि दु:ख याशिवाय काहीच हाती लागत नाही. त्यामुळे, या आजी-आजोबाने कोरोनावर मात करुन कोरोनातून आपणही बरे होऊ शकतो, हाच मंत्र दिला आहे.
(105-year-old grandfather and 95-year-old grandmother defeated Kelly Corona; Positive events in Latur district.)

देशात कोरोना विषाणू (Corona Virus) संसर्गाच्या महामारीचं संकट मोठ्या प्रमाणात असून महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोना रुग्ण आढळून येत आहेत. यामुळे राज्यात कडक निर्बंध लागू करण्यात आले. रुग्णालयात रुग्णांची मोठी गर्दी पाहायला मिळत असून कोरोनाचा मृत्यूदरही वाढला आहे. मात्र, या नकारात्मक वातावरणातही एक ऊर्जा देणारी, सकारात्मक बातमी (Positive News) आहे. चक्क 105 वर्षांचे आजोबा अन् 95 वर्षांच्या आजीनें कोरोनावर मात केली आहे. यापूर्वी बीड जिल्ह्यात एका वृध्दाश्रमातील वयोवृध्दांनी कोरोनावर मात केल्याची सकारात्मक बातमी (Positive News) प्रकाशझोतात आली होती.

राज्यातील कोरोना रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. तसेच, रुग्णालयात बेड, ऑक्सिजन आणि रेमडीसीवीर इंजेक्शनसाठी रुग्णांच्या नातेवाईकाची धडपड पाहायला मिळत आहे. स्मशानभूमीतही मृतदेहांवरील अंत्यसंस्कारासाठी रांग लागल्याचंही आपण पाहिलं. दुसरीकडे सोशल मीडियावरही (Social Media) भावपूर्ण श्रद्धांजलीच्या पोस्ट मोठ्या प्रमाणात पडत आहेत. मात्र, या निगेटीव्ह वातावरणातही रुग्णाचं आणि त्यांच्या नातेवाईकांचं मनोबल वाढविणारी एखादी माहिती समोर येते. लातूर जिल्ह्यातील चव्हाण दाम्पत्यांची कथा अशीच म्हणावी लागेल.

लातूर (Latur) ग्रामीणच्या काटगाव तांडा (कृष्णानगर) येथील 105 वर्षांचे धेनू उमाजी चव्हाण आणि 95 वर्षांच्या मोताबाई चव्हाण या दाम्पत्याने वेळेवर उपचार घेऊन कोरोनावर मात केली आहे. सध्याच्या वातावरणात वाचायला मिळालेली ही एक अत्यंत सकारात्मक बातमी आहे. लातूर ग्रामीणचे आमदार धीरज देशमुख यांनी या आजी-आजोबाचा फोटो शेअर करत, ही आनंदाची बातमी दिली. सध्याच्या वातावरण कोरोना रुग्णांना धीर देणारी, त्यांचं मनोधैर्य वाढवणारी ही बातमी आहे. धीरज देशमुख यांनी ट्विट करुन याबाबत माहिती दिलीय.

दरम्यान, राज्यात लॉकडाऊन असल्याने सोशल मीडिया (Social Media) आणि टेलिव्हीजनवरच अनेकांचा वेळ जात आहे. त्यातच, रुग्णालयातील विदारक दृश्य पाहून वेदना आणि दु:ख याशिवाय काहीच हाती लागत नाही. त्यामुळे, या आजी-आजोबाने कोरोनावर मात करुन कोरोनातून आपणही बरे होऊ शकतो, हाच मंत्र दिलाय, असेच म्हणावे लागेल.

Exit mobile version