धारवाड : दि.१५- पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर भीषण दुर्घटना घडली आहे. धारवाड राष्ट्रीय महामार्गावर (NH) मिनी बस आणि ट्रकचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात संक्रांत (Sankrant) साजरी करण्यासाठी गोव्याला निघालेल्या ११ महिला जागीच ठार झाल्या असून पाच जणींची चिंताजनक स्थिती आहे. स्थानिक नागरिक व पोलिसांनी जखमींना तातडीने धारवाड (Dharwad) येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले.
पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर आज सकाळी ही घटना घडली. दावणगिरीहून काही पर्यटक हे गोव्याला मिनी बसने जात होते. पहाटे धारवाड (Dharwad) महामार्गावर (NH) मिनीबस आणि ट्रकची जोरदार धडक झाली. हा अपघात (Accident) इतका भीषण होता की, यात मिनी बसचा चुराडा झाला आहे. या अपघातात ११ महिला जागीच ठार झाल्या आहेत. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळावर महामार्ग पोलिसांनी (Police) धाव घेतली. जखमी प्रवाशांना तातडीने धारवाड येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनूसार देवनगरे येथील महिला क्लबच्या १७ सदस्या मकरसंक्रांत (Sankrant) साजरी करण्यासाठी गोव्याला मिनी बस ने निघाल्या होत्या. मात्र कर्नाटकातील धारवाड जवळ इटगट्टी जवळ पहाटे ३ च्या सुमारास मिनीबस व टिप्परची समोरासमोर धडक होवून भीषण अपघात (Accident) झाला. यात १० महिलांचा जागीच मृत्यू झाला तर ५ महिलांची प्रकृती चिंताजनक आहे. दोघींना किरकोळ दुखापत झाली आहे. अपघाताची माहिती मिळताच धारवाड ग्रामीण पोलिस ठाण्याचे पोलिस (Police) उपनिरिक्षक महेंद्रकुमार यांनी घटनास्थळी जावून मदत केली. गंभीर व चिंताजनक स्थिती असलेल्या जखमी महिलांना पुढील उपचारासाठी हुबळी येथील किम्स रुग्णालयात हलविण्यात आले आहे.