पुणे दि.२५(वि.प्र) कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मराठी पञकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम.देशमुख यांच्या सुचनेनुसार पुणे जिल्हा पञकार संघाच्या गरजू पञकारांनास जीवनावश्यक वस्तूंचे (किराणा किट) वाटप करण्यात आल्या. पुणे जिल्हा पत्रकार संघाच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतूक होत आहे.
मराठी पञकार परिषदेचे कार्याध्यक्ष शरद पाबळे,पुणे विभागीय सचिव बापूसाहेब गोरे व पुणे जिल्हा पञकार संघाचे अध्यक्ष सुनील लोणकर यांनी पुणे जिल्हा पत्रकार संघाच्या सदस्यांना नियोजनबद्ध पद्धतीने व कोरोना सोशल डिस्टनिंग ठेवून किराणा किट जिल्ह्यात घरपोहोच केले. दोन दिवसांपूर्वी जिल्ह्यातील काही पत्रकार सदस्यांनी पुन्हा किट ची विचारणा केल्याने पुणे येथील डिक्की संस्थेच्या वतीने गरजू पञकार सदस्यांना वाटप करण्याकरीता काल डिक्की संस्थेचे संस्थापक पद्मश्री मिलिंद कांबळे यांच्याकडून किट घेण्यात आले. यावेळी पुणे विभागीय सचिव बापूसाहेब गोरे समवेत जेष्ठ पञकार राजू वाघमारे, पुणे जिल्हा पञकार संघाचे अध्यक्ष सुनील लोणकर व पुरंदर तालुका पञकार संघाचे उपाध्यक्ष अमोल बनकर हे उपस्थित होते. पुणे जिल्हा पत्रकार संघाच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतूक होत आहे.